आमदारकीचा राजीनामा द्या, कन्येलाही भाजपमध्ये आणा; एकनाथ खडसेंची घरवापसी सशर्त

आमदारकीचा राजीनामा द्या, कन्येलाही भाजपमध्ये आणा; एकनाथ खडसेंची घरवापसी सशर्त

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. त्यांनी स्वतः आज त्याबद्दल माहिती दिली. पण खडसे यांना राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, तसेच त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनादेखील पक्षात आणावे लागेल, असे भाजप पक्षश्रेष्ठाRनी बजावल्याचे समजते.

खडसे यांनी 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदारही झाले, मात्र आता पुन्हा त्यांची घरवापसी होणार आहे. खडसे भाजपमध्ये जाणार हे निश्चित झाले असले तरी कन्या रोहिणी खडसे यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे म्हटले आहे. सध्या त्या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. रोहिणी खडसे यांचे राष्ट्रवादीत राहणे भाजपसाठी अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे खडसे यांनी भाजपमध्ये येताना त्यांच्या कन्येलाही घेऊन यावे अशी गळ भाजपने घातली आहे.

शरद पवार यांचा मी ऋणी

एकनाथ खडसे यांनी आपण भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीमध्ये भेट घेतल्याचे सांगत येत्या 15 दिवसांत आपला भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होईल असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. संकटाच्या काळात शरद पवार यांनी आपली नेहमीच मदत केली असून मी त्यांचा ऋणी आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;