बच्चू कडू यांचा भाजपला पुन्हा झटका; अमरावतीपाठोपाठ अकोल्यात काँग्रेसला थेट पाठिंबा
अमरावतीपाठोपाठ बच्चू कडू यांनी आज अकोल्यातही भारतीय जनता पक्षाला झटका दिला. अकोल्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवाराला कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपच नव्हे, तर महायुतीला धक्का बसला आहे.
अमरावतीमध्ये भाजपने नवनीत राणा यांना दिल्यापासून बच्चू कडू हे नाराज आहेत. बच्चू कडू यांच्या प्रहारने नवनीत राणा यांच्याविरोधात दिनेश बूब यांना उमेदवारी देऊन भाजपला पहिला धक्का दिला होता. आज अकोल्यात प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा मेळावा झाला. त्यात जिल्हा कार्यकारिणीने काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठिंबा देण्याची मागणी बच्चू कडूंकडे केली. अकोल्यातले भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्याकडून प्रहारला अपेक्षित सन्मान दिला जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये भाजपबद्दल रोष आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे प्रहारचे जिल्हाध्यक्ष कुलदीप पाटील वसू यांनी म्हटले आहे. रामटेकमध्येही काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार बर्वे यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List