पश्चिम बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर विनयभंगाचा गुन्हा, हल्ल्याच्या घटनेला वेगळे वळण

पश्चिम बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर विनयभंगाचा गुन्हा, हल्ल्याच्या घटनेला वेगळे वळण

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेला वेगळे वळण लागले आहे. एनआयएचे अधिकारी मध्यरात्री दरवाजे तोडून घरात घुसले आणि त्यांनी विनयभंग केला, अशी तक्रार महिलांकडून करण्यात आल्यानंतर त्याआधारे पोलिसांनी एनआयए अधिकाऱयांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

भूपतीनगर बॉम्बस्पह्टप्रकरणी एनआयए पथकाने अटक केलेले तृणमूल काँग्रेसचे नेते मोनोब्रत जाना यांच्या पत्नीने तसेच अन्य महिलांनी केलेल्या तक्रारीनुसार एनआयए अधिकाऱयांवर तपासाच्या बहाण्याने घरात जबरदस्तीने घुसून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी केलेल्या कारवाईत एनआयएच्या अधिकाऱयांनी 2022 मधील या स्पह्ट प्रकरणातील दोन संशयित बालाई चरण मैती आणि मनोब्रत जाना यांना अटक केली होती. या वेळी जमावाने दगडफेक, हल्ला केल्याचे एनआयएचे म्हणणे आहे. तर या पथकानेच गावकऱयांवर हल्ला केल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. शनिवारी रात्रीच या अधिकाऱयांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गैरवर्तन आणि नासधूस केल्याची तक्रार

जाना यांच्या पत्नी मोनी जाना यांनी भूपतीनगर पोलीस ठाण्यात एनआयए अधिकाऱयांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या अधिकाऱयांनी आपल्याशी गैरवर्तन केले आणि माझ्या निवासस्थानातील मालमत्तेचीही नासधूस केली, असा आरोप त्यांनी या तक्रारीत केला आहे, असे एका पोलीस अधिकाऱयाने सांगितले. आम्ही या तक्रारीनुसार भारतीय दंडसंहितेच्या 354 कलमानुसार कोणत्याही महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे या आरोपाखाली एफआयआर नोंदवला असून चौकशी करत आहोत, असे हा अधिकारी म्हणाला. एनआयए अधिकाऱयांनी रात्री उशिरा घराचे दरवाजे तोडून महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

– एनआयए आणि भाजप यांच्यात ‘अपवित्र युती’ असून निवडणूक आयोग मात्र या बेबंदशाहीबद्दल मौन बाळगून असल्याचा आरोप तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनीही ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये केला.

तपास यंत्रणांकडून तृणमूल नेत्यांना धमक्या

केंद्रीय तपास यंत्रणा तृणमूल नेत्यांवर एकतर भाजपमध्ये सामील व्हा नाहीतर कारवाईला सामोरे जा, असे सांगत दबाव आणत आहेत, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी पुरुलिया येथील एका सभेत केला. एनआयए, ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर टीएमसी नेत्यांना त्रास देण्यासाठी केला जात आहे. ते पूर्वकल्पना न देता छापे टाकत आहेत आणि घरांमध्ये घुसत आहेत. सर्व जण झोपेत असताना त्यांच्या घरात रात्रीचे कोणी घुसले तर महिला काय करतील, असा प्रश्न त्यांनी विचारला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;