भुजबळ फक्त लोकसभेला उभे राहू द्या, मग दाखवतो! मनोज जरांगे यांनी शड्डू ठोकला
नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या बेतात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. भुजबळ फक्त लोकसभेला उभे राहू द्यात, मग दाखवतोच, असा इशारा त्यांनी दिला आहे.
महायुतीच्या जागावाटपाच्या तिढय़ातून नाशिक मतदारसंघाची अद्याप सुटका झालेली नाही. मात्र अजित पवार गटाने भुजबळ यांना नाशिकच्या मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी भुजबळांची काsंडी करण्याचे संकेत दिले.
मनोज जरांगे आज पुण्यातील देहू येथे आले होते. त्यांना यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यांनी भुजबळांबद्दल जास्त काही विचारू नका, असे सांगितले तसेच लोकसभा लढवायचा भुजबळांचा अंतिम निर्णय होऊ द्या मग सांगतो, असे जरांगे म्हणाले. राज्यभरात कोणत्या उमेदवारांना निवडून द्यायचे हे मराठा समाजाने ठरवावे, पण नाशिकमधून भुजबळ उभे राहिले तर काय भूमिका घ्यायची हे त्यावेळी सांगतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List