मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी नीता अंबानी यांच्यासह 18 हजार मुले वानखेडेवर
कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली अखेर आज मुंबई इंडियन्सने विजयाचे खाते खोलले. रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला.
दरम्यान मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या एज्युकेशन फॉर ऑल या मोहिमेअंतर्गत, मुंबई शहरातील 18 हजार मुले संघाला पाठिंबा देण्यासाठी आली होती. PLAY FOR EDUCATION मधील मुंबई इंडियन्स फ्रँचायझीची ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेतून हजारो गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च मुंबई इंडियन्सतर्फे केला जातो.क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या या 18 हजार मुंलांनी मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान केली होती. त्यामुळे संपूर्ण वानखेडे स्टेडियम निळ्या महासागर’ सारखे दिसत होते. सगळेजण मिळून मुंबई इंडियन्सला पाठिंबा देत होते. यावेळी नीता अंबानी आणि सचिन तेंडूलकरने या मुलांसोबत त्यांचा अनुभव सांगत त्यांच्याशी संवांद साधला.
मुलांचे शिक्षण आणि खेळ याचे महत्त्व पटवून देताना नीता अंबानी म्हणाल्या की, आज माझ्यासोबत असणारा प्रत्येक मुलगा या खेळाचा आनंद घेत आहे आणि यातूनच शिकत आहेत. कदाचित या मुलांपैकी अनेकांचे खेळाडू बवनण्याचे स्वप्न असेल. मला आशा आहे की आजच्या या अनुभवातून ते नक्कीच त्यांच स्वप्न पूर्ण करतील. असे त्या यावेळी म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List