IPL 2024 – हुश्श..! अखेर मुंबईने खाते उघडले, सलग तीन पराभवानंतर विजय गवसला; दिल्लीवर 29 धावांनी मात
सलग तीन सामने हरल्यानंतर हार्दीक पांड्याच्या मुंबई इंडियन्सने अखेर विजयाचे खाते खोलले. रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. 234 धावा ही वानखेडेवरील आयपीएलमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने तुफान फलंदाजी करत 20 षटकात पाच गडी गमावत 234 धावा केल्या. यात रोहीत शर्माने 49(27), इशान किशन 42 (23), हार्दीक पांड्या 39(33), टीम डेव्हिड 45(21) पण या सर्वांपेक्षा प्रभावी फलंदाजी केली ती रोमारिओ शेफर्ड याने. शेफर्डने 4 षटकार, 3 चौकार मारत 10 चेंडूत 39 धावा केल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List