यवतमाळ गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 53 लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसलेली असताना, अवैध रेती तस्करी पाठोपाठ प्रतिबंधित गुटख्याविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करीत सुमारे 53 लाखाच्या प्रतिबंधित गुटखा सहित एकूण 67 लाखांचा मुद्देमाल जब्त केला आहे . यामुळे गुटका तस्करांचे धाबे दणाणले आहे .
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात तीव्र मोहीम सुरू केली आहे. अवैधरित्या सुरू असलेली रेती तस्करी जुगार अड्डे, देशीदारुचे अड्डे यावर धडक कारवाई केल्यानंतर आता पोलिसांनी आपला मोर्चा प्रतिबंधित गुटख्याकडे वळविला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु भरुन असलेले एक आयशर वाहन दारव्हा रोडने यवतमाळ कडे येणार असल्याची खात्रीलायक वृत्त मिळाले.त्यानुसार पोलिसांनी यवतमाळ दारव्हा रोडवरील घाटात चिहरवार कंस्ट्रक्शन समोर सापळा रचला . एका संशयित आयशर गाडीवाला थांबविले असताना त्या गाडीतून तब्बल 52 लाख 37 हजार 600 रुपयाचा प्रतिबंधीत तंबाखु युक्त गुटका मिळाला .पोलिसांनी प्रतिबंधित गुटक्यासह एकूण 67 लाखाचा मुद्देमाल जब्त केला आहे . यवतमाळ ग्रामीण येथे अन्न सुरक्षा मानके व भा.द.वि कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करुन आरोपी तोरन सुखराम गहाणे याला अटक केली आहे . पुढील तपास सुरु आहे .
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात, श्री. आधारसिंग सोनोने पो.नि. स्वागुशा, सहा. पोलीस निरीक्षक, अमोल मुडे, पोउपनि राम कांडुरे, पोलीस अंमलदार योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List