पुणे बाजार समितीत आंबा ग्राहकांची फसवणूक, हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री

पुणे बाजार समितीत आंबा ग्राहकांची फसवणूक, हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये कोकणातील रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्यांच्या नावाखाली कर्नाटक येथून येणार्‍या आंब्यांची सर्रास विक्री सुरू आहे. ग्राहकांची फसवणूक करणार्‍या आडत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे पणन संचालकांचे आदेश समितीने धाब्यावर बसविले आहेत. बाजार समिती प्रशासनच आडत्यांना पाठीशी घालत असून शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडल्याचे चित्र आहे.

फळांचा राजा म्हणून देशासह परदेशात रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याने नावलौकिक मिळविला आहे. नावलौकीकाबरोबर रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याला जीआय (भौगोलिक उपदर्शन) हे गुणवत्तेचे मानांकन मिळाले आहे. मार्केटयार्डमध्ये आंब्यांचा हंगाम बहरला असून, कोकणातील हापूससह परराज्यांतील विविध जातींच्या आंब्यांची आवक वाढली आहे. मात्र, अनेक आडते ग्राहकांची फसवणूक करीत परराज्यांतील आंब्यांची रत्नागिरी, देवगड हापूस आंब्यांच्या नावाने विक्री करीत आहेत. या फसवणुकीस आळा बसण्यासाठी तत्कालीन पणन संचालकांनी परिपत्रक काढत अशा फसवणूक करणार्‍या आडत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश राज्यातील सर्व बाजार समित्यांना देऊन सुमारे चार वर्षे होत आले. मात्र, मार्केटयार्डमध्ये राजरोसपणे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील आंब्यांची देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केली जात आहे.

साटेलोट्यामुळे कर्मचार्‍यांकडून कारवाई नाही !

मार्केटयार्डात आंबा शेड, फळबाजारातील गाळ्यांसह जी 55 जागांवरदेखील परराज्यांतील आंब्याची देवगड, रत्नागिरी हापूस आंब्याच्या बॉक्समध्ये भरून विक्री केली जात आहे. मुळ कोकणातील आंब्याच्या नावाखाली कर्नाटक आंब्याच्या विक्रीमुळे बाजार समितीसह कोकणतील आंब्याच्या नावलौकीकास बाधा येत आहे. मात्र, फळबाजारातील कर्मचारी आणि आडते यांच्यात साटेलोट्यामुळे आडत्यांवर कारवाई थांबविल्याची बाजारात चर्चा आहे.

हापूसच्या नावाखाली इतर आंबा विक्री करून फसवणूक करणार्‍या आडत्यांवर पहिल्या टप्प्यात दंडात्मक आणि परवाना निलंबनाच्या कारवाई केली जाईल. पुढील काळात नियमानुसार कायदेशीर कारवाई कडक कारवाई केली जाणार आहे. – डॉ.राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;