घटस्फोटानंतर राजघराण्याच्या मुलीसोबत दुसरं लग्न करणार ‘हा’ अभिनेता; म्हणाला, ‘गुपचूप लग्न केलं असतं तर…’

घटस्फोटानंतर राजघराण्याच्या मुलीसोबत दुसरं लग्न करणार ‘हा’ अभिनेता; म्हणाला, ‘गुपचूप लग्न केलं असतं तर…’

झगमगत्या विश्वात अनेक सेलिब्रिटींचं घटस्फोट झालं आहे. घटस्फोटानंतर अनेकांनी एकटं राहण्याचा निर्णय घेतला, तर अनेक सेलिब्रिटींच्या आयुष्यात पुन्हा नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. असंच काही झालं आहे अभिनेता सिद्धार्थ याच्यासोबत… सिद्धार्थ अभिनेत्री अदिती राव हैदरी हिच्यासोबत दुसरं लग्न करणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अदिती हिचं देखील सिद्धार्थ याच्यासोबत दुसरं लग्न आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अदिती आणि सिद्धार्थ यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली आहे.

अदिती आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाची चर्चा सुरु असताना, दोघांनी साखरपुडा झाल्याचा फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये दोघे साखरपुड्याची आंगठी दाखवताना दिसत आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थ याने अदिती हिच्यासोबत झालेल्या साखरपुड्यावर मोठं वक्तव्य केलं. शिवाय अभिनेत्याने लग्नाबद्दल देखील मोठी अपडेट दिली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

 

सिद्धार्थ म्हणाला, ‘आम्ही गुपचूप साखरपुडा उरकला आहे… असं अनेक जण मला म्हणाले. पण कोणतीही गोष्ट कुटुंबासोबत खासगी स्वरुपात केल्याने की गोष्ट गुपचूप केली… असा त्याचा अर्थ होत नाही. आम्ही ज्या लोकांनी निमंत्रण दिलं नाही. त्यांना वाटलं आम्ही गुपचूप साखरपुडा केला. पण जे पाहुणे साखरपुड्यासाठी उपस्थित होते, सत्य काय आहे त्यांना माहिती आहे…’

सिद्धार्थ – अदिती कधी अडकणार लग्नबंधनात

सिद्धार्थ – अदिती यांच्या लग्नाबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ म्हणाला, ‘लग्नाची तारीख कुटुंबिय ठरवणार आहेत. लग्नाची तारीख आहे, कोणत्या सिनेमाच्या शुटिंगची नाही. आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे लग्नाची योग्य वेळ कुटुंबिय ठरवतील…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिद्धार्थ – अदिती यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, सिद्धार्थ – अदिती यांचं दोघांचं देखील दुसरं लग्न आहे. अदिती हिचं पहिलं लग्न वयाच्या 21 व्या वर्षी अभिनेता सत्यदीप मिश्रा याच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 4 वर्षांनंतर अदिती आणि सत्यदीप यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर सत्यदीप याने प्रसिद्ध आणि लोकप्रिय फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिच्यासोबत लग्न केलं. मसाबा गुप्ता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;