आमिर खान – किरण यांना कधी लग्न करायचं नव्हतंच? फक्त एका कारणामुळे अडकले विवाहबंधनात

आमिर खान – किरण यांना कधी लग्न करायचं नव्हतंच? फक्त एका कारणामुळे अडकले विवाहबंधनात

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आमिर खान आणि दुसरी पत्नी किरण राव यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे. किरण राव हिने मुलाखतींच्या माध्यमातून आमिर याच्यासोबत असलेल्या नात्याचं सत्य सांगितलं. सांगायचं झालं तर, आमिर – किरण यांनी 2005 मध्ये लग्न केलं. त्यानंतर 2021 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नुकताच झालेल्या मुलाखतीत किरण म्हणाली, ‘घटस्फोट घेताना मला कोणती भीती वाटली नाही, कारण आमिर याने मला कायम सपोर्ट केलं आहे…’

‘आमिर आणि मी लग्नाआधी एक वर्ष एकत्र राहिलो होतो आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, फक्त आई – वडिलांची इच्छा होती म्हणून आम्ही लग्न केलं. मला असं वाटतं तुमच्यासाठी लग्न म्हणजे नेमकं काय आहे. कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही लग्न करत आहात… समाजाच्या ज्या मान्यता आहेत, त्या अनेकांसाठी फार महत्त्वाच्या असतात. मुलांसाठी महत्त्वाच्या असतात.’

पुढे किरण म्हणाली, ‘लग्नामुळे महिलांवर एक प्रकारचा दबाव येतो आणि ही गोष्ट आपण कधी बोलतच नाही. महिलांवर घर सांभाळणं, कुटुंबाला एकत्र ठेवणं इत्यादी जबाबदाऱ्या असतात. मी माझ्या आयुष्यात चांगली वेळ व्यतीत केली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम माझ्यावर होत नाही.’

‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमिर माझ्या बाजूने भक्कम उभा होता. आमचं नातं देखील भक्कम होतं. आम्ही दोघं एकमेकांचा सन्मान करतो, एकमेकांचा आदर करतो… याच कारणामुळे मला कधी त्रास झाला नाही. मला माहिती होतं की मला माझी स्पेस हवी आहे. मला स्वतःचं आयुष्य जगायचं होतं. पुढे जाण्यासाठी मला आमिर याच्यापासून विभक्त होण्याची गरज आहे. आमिर याचा सपोर्ट होता, म्हणून मला घटस्फोटाची भीती वाटली नाही…’ असं देखील किरण राव म्हणाली.

आमिर खान याची दुसरी पत्नी गेल्या काही दिवसांपासून ‘लापता लेडीज’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने तगडी कमाई केली. सांगायचं झालं तर, सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान किरण राव हिने स्वतःच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याचा खुलासा केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;