पत्ता विचारण्याच्या बहाणा करत ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी लांबवली
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील कौलीमळा येथे रविवारी सकाळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर विष्णु भोर (वय 70) यांच्याजवळील चार तोळे वजनाची सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी लांबविण्याची घटना घडली आहे. चोरांनी लांबवलेल्या सोनसाखळीची किंमत अंदाजे अडीच लाख रुपये आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे अवसरी परिसरात भीतीचे वातावरण आहे.
अवसरी खुर्द गावच्या पश्चिमेला कौलीमळावस्ती आहे. रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर भोर मित्रांसोबत चावडीवर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी दोन अज्ञात चोरटे मोटरसायकलवर आले. त्यापैकी एकजण ज्ञानेश्वर भोर यांच्याजवळ आला आणि ज्ञानेश्वर भोर यांना म्हणाला बाबा तुमच्या गळ्यातील चैन असली आहे का नकली आहे? आम्हाला बघायची आहे. तसेच त्यांना एका पत्त्याबाबत विचारणा केली. अशा प्रकारे भोर यांना बोलण्यात गुतंवले आणि त्यांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याची चैन पाहण्यासाठी घेतली. त्यानंतर चोरटे चैन घेऊन पसार झाले. एक महिन्यापूर्वी मंचर मुळेवाडी रोड कॉलेज रस्त्यावर अशाच प्रकारची घडला घडली होती. जेष्ठ महिला सायंकाळच्या दरम्यान पायी फिरण्यासाठी अवसरी कॉलेजकडे येत असताना मोटरसायकलवरील अज्ञात चोरट्याने जेष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र पळविले होते. मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्येष्ठ नागरिकांचे सोन्याचे दागिने पळवण्याच्या घटकांमध्ये वाढ झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List