फडणवीसांना विनोद तावडे यांनी चिटपट केलेय..! सुषमा अंधारे यांचा फडणवीसांना टोला
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी-विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. राजकीय वर्तुळात त्याची चर्चा होत आहे.
सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांची नावे घेत सध्याच्या राजकी परिस्थितीचा उल्लेख केला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा संदर्भ देत विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीसांना चितपट केले आहे, असे सुषमा अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच पोस्टच्या शेवटी ‘आताकधीचयेणारनाही’ असा हॅशटॅग देत फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन, या घोषणेला जबरदस्त टोला लगावला आहे.
पंकजा मुंडे , महादेव जानकर यांना उमेदवारी जळगाव चा उमेदवार बदलण्याची तयारी, श्री एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शहा यांच्याशी भेट, फडणविसाना 2-2दिवस वेटिंग आणि नवनीत राणा यांना एक तासाच्या आत भेट या सगळ्यांचा अर्थ..
फडणवीसांना विनोद तावडे यांनी चिटपट केलेय..! #आताकधीचयेणारनाही pic.twitter.com/znekHdKydV— SushmaTai Andhare
(@andharesushama) April 6, 2024
पंकजा मुंडे-महादेव जानकर यांना उमेदवारी, जळगावचा जाहीर उमेदवार बदलण्याची तयारी, एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शाह यांच्याशी भेट, देवेंद्र फडणवीसांना भेटीसाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागणं, पण त्याचवेळी नवनीत राणा यांना मात्र तासाभरात भेट… या सगळ्याचा अर्थ फडणवीसांना विनोत तावडेंनी चितपट केलं आहे, अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे. याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
(@andharesushama)
Comment List