जुन्नर तालुक्यात बिबट्याचा थरार, वनविभागाने केले जेरबंद
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचा वावर वाढला असून रविवारी सकाळी थरार पहायला मिळाला. येथील प्रकाश दत्तात्रय डोंगरे यांच्या घरामागील पटांगणामध्ये बिबट्या लपून बसला होता. बिबट्याची चाहूल लागताच त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला.
वनविभागाने पथकासह घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र जखमी अवस्थेतील बिबट्या गांगरून गेला आणि पळून गेला. दोन वेळा हुलकावणी दिल्यानंतर हा बिबट्या डोंगरे यांच्या घरामागे असलेल्या विहिरीमध्ये अडकला. तिथेच वनविभागाने त्याला जेरबंद केले आहे. हा बिबट्या जखमी असून त्याच्यावर उपचार करून त्याला मुक्त केले जाईल, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List