मी मतदान करणार, तुम्हीही करा; मतदान जनजागृतीसाठी रत्नागिरीत सायकल रॅली
रत्नागिरी उपविभागीय कार्यालय आयोजित आणि रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने मतदान जनजागृती करणारी सायकल रॅली शहरातून रविवारी काढण्यात आली. ‘मी मतदान करणार आहे, तुम्हीही करा, तुमच्या शेजाऱ्यांनाही करायला प्रोत्साहित करा. ती आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे’, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.
पोलीस मैदानात रविवारी सकाळी रॅलीसाठी सायक्लिस्ट आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या रॅलीला प्रोत्साहित करण्यासाठी पोलीस दलाचा बँड तैनात होता. तो देशप्रेमावर आधारित गीताची धून वाजवित होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह रत्नागिरी सायक्लीस्ट क्लबचे डॉ. नितीन सनगर आणि सायक्लिस्ट आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, मी जेथे जातो, तेथे सर्वप्रथम माझे मतदानाचे ओळखपत्र करुन घेतो. येथेही ओळखपत्र घेतले आहे. यंदाच्या निवडणुकीत मी मतदान करणार आहे. तुम्हीही करा. त्याचबरोबर तुमच्या शेजाऱ्यांना आणि तरुण मतदारांना मतदान करण्यासाठी सांगा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List