अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचा काटेकोर अभ्यास करा; एम. देवेंदर सिंह यांच्या सूचना

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचा काटेकोर अभ्यास करा; एम. देवेंदर सिंह यांच्या सूचना

निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मतदान प्रक्रीयेदरम्यान अधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करु नये, या सुचनांचा काटेकोर अभ्यास करावा. त्यादृष्टीने सर्वांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. त्यासाठी निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदान प्रक्रियेमध्ये थेट सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष/मतदान अधिकारी यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि कुडाळ येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृह तसेच कुडाळ येथे प्रशिक्षणासाठी उपस्थित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांशी निवडणूक निर्णय अधिकारी सिंह आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणी व समस्याही जाणून घेतल्या. प्रशिक्षणानंतर त्यांनी सावंतवाडी येथील स्ट्रॉंग रूमची देखील पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपविभागीय अधिकारी सावंतवाडी हेमंत निकम, तहसिलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी, दोडामार्ग तहसिलदार अमोल पोवार, अपर तहसिलदार मोनिका कांबळे, उपविभागीय अधिकारी कुडाळ, ऐश्वर्या काळुसे, कुडाळचे तहसिलदार विरसिंग वसावे आणि मालवणच्या तहसिलदार वर्षा झाल्टे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सिंह म्हणाले, आपल्यावर असलेली जबाबदारी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व बाबी, पूरक साहित्य, त्याचा वापर, मतदान केंद्रावर घ्यावयाची आवश्यक खबरदारी या सर्व बाबी गतिमानतेने, अचूकपणे पार पाडण्याची जबाबदारी मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांची आहे. आपल्याला दिलेली जबाबदारी आणि काम अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्याच्या भूमिकेतून सर्वांनी या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उपयोग करून घ्यावा. त्याचबरोबर प्रशिक्षणादरम्यान आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंका व प्रश्न आपल्या प्रशिक्षकांना मनमोकळेपणाने विचारा आणि त्यांचे निराकरण करून घ्या, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;