आर्यन खान याला 8 वर्ष मोठ्या गर्लेफ्रेंडने दिली flying kiss, किंग खानचा लेक लाजला आणि…

आर्यन खान याला 8 वर्ष मोठ्या गर्लेफ्रेंडने दिली flying kiss, किंग खानचा लेक लाजला आणि…

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आर्यन खान याच्या आयुष्यात एका परदेशी मॉडेलची एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली आहे. आर्यन एका ब्राझिलियन मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आर्यन याच्यासोबत ज्या मॉडेलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ती दुसरी तिसरी कोणी नाहीतर, लारिसा बोन्सी आहे.

आर्यन आणि ब्राझिलियन मॉडेलच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत असताना रेडिटवर दोघांचा एक व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आर्यन खान, ब्राझिलियन मॉडेल आणि त्यांचे इतर मित्र देखील दिसत आहेत. रेडिटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लारिसा बोन्सी, आर्यन याला फ्लाइंग किस देताना दिसत आहे.

लारिसा बोन्सी आणि आर्यन खान यांच्या व्हिडीओवर नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त लारिसा बोन्सी आणि आर्यन खान यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी देखील एक व्हिडीओ समोर आला होता, त्या व्हिडीओमध्ये आर्यन, लारिसा बोन्सी हिच्या कुटुंबासोबत दिसला होता.

एवढंच नाहीतर, आर्यन याने लारिसा बोन्सी हिची आई रेनाटा बोन्सी यांना D’YAVOL X चा एक जॅकेट देखील दिल्याची माहिती समोर आली होती. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण शाहरुख खान, गौरी खान, आर्यन खान यांनी यावर अधिकृत घोषणा केलेली नाही.

लारिसा बोन्सी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. शिवाय काही तेलुगू सिनेमात देखील लारिसा बोन्सी हिने काम केलं आहे. सध्या सर्वत्र लारिसा बोन्सीआर्यन खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. पण दोघे खरंच एकमेकांना डेट करत आहेत की नाहीत.. यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by D’YAVOL X (@dyavol.x)

 

आर्यन खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या पहिली सीरीज स्टारडमची तयारी करत आहे. आर्यन खान याला अभिनयात रस नसून, लेखण, दिग्दर्शन क्षेत्रात किंग खानचा लेक करिअर करणार आहे… असं खुद्द शाहरुख खान म्हणाला आहे. किंग खान कायम मुलांबद्दल महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;