प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 27 व्या वर्षी निधन, जंगलात भयानक अवस्थेत आढळला मृतदेह

प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 27 व्या वर्षी निधन, जंगलात भयानक अवस्थेत आढळला मृतदेह

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वयाच्या 27 व्या वर्षी एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचं निधन झालं आहे. अभिनेत्याच्या निधनांमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्याचा मृतदेह जंगलात आढळल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत केली होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे अभिनेता घरगुती हिंसाचार प्रकरणातील संशयित असल्याची महिती समोर येत आहे. सध्या ज्या अभिनेत्याच्या निधनाची माहिती समोर आली आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून ‘येलोस्टोन 1923’ सीरिजमधील अभिनेता कोल ब्रिंग्स प्लेंटी आहे.

कोल याचं निधन 6 एप्रिल रोजी निधन झालं. तो रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळून आला. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात कोल संशयित होता. 27 वर्षीय अभिनेत्याचा मृतदेह सापडला जेव्हा स्थानिक पोलिसांना एका रिकाम्या वाहनाची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आलं. पोलिसांनी सांगितले की, कोलचा मृतदेह कारजवळ जंगलात सापडला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mo Brings Plenty (@mobringsplenty)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी काही अधिकारी एका अपार्टमेंटमध्ये महिलेच्या मदतीसाठी पोहोचले. मात्र ते घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच संशयित फरार झाला होता. फरार झालेल्या संशयित कोल होता… असं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं होतं.

ट्रॅफिक कॅमेऱ्यांच्या मदतीने कोल याला ओळखणं सोपं झालं होत. पोलीस कोल याच्या शोधात असताना, त्यांना एक मृत व्यक्ती आढळून आला. तेव्हा तो मृतदेह कोल याचा होता. जंगलात एका वाहनाच्या बाजूला अभिनेत्याचा मृतदेह आढळून आला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कोल याच्या मृत्यूची चर्चा रंगली आहे.

कोल याच्या काकांची सोशल मीडिया पोस्ट

कोल याच्या काकांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘मला एक गोष्ट सांगताना प्रचंड दुःख होत आहे की, कोल भेटला आहे, पण तो आता आपल्यात नाही… कोल याच्यासाठी तुम्ही दाखवलेलं प्रेम आणि केलेल्या प्रार्थनेसाठी आम्ही आभार व्यक्त करतो…’

‘माझ्या मुलाच्या शोधात आमच्यात सामील झालेल्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानू इच्छितो. या आठवड्यात माहिती झालं, की कोलच्या मनातील चांगुलपणा किती लोकांना माहित आहे आणि किती लोकं त्याच्यावर प्रेम करतात..’ असं देखील अभिनेत्याचे काका म्हणाले. सध्या सर्वत्र कोल याच्या मृत्यूची चर्चा रंगत आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे झगमगत्या विश्वात खळबळ माजली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;