झुकरबर्ग यांनी मस्कना मागे टाकले!
फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा’चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टेस्लाचे मालक एलन मस्क यांना मागे टाकले आहे. झुकरबर्ग हे आता या यादीत जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. 2020 नंतर प्रथमच झुकरबर्ग यांनी हे स्थान मिळवले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीनुसार, एलन मस्क 181 अब्ज
डॉलर (जवळपास 15.07 लाख कोटी) संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. मार्चच्या सुरुवातीला ते या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. या वर्षी एलन मस्क यांची एकूण संपत्ती 48.4 अब्ज डॉलरने कमी झाली आहे, तर झुकेरबर्ग यांच्या संपत्तीमध्ये 58.9 अब्ज डॉलर वाढले आहेत.
हिंदुस्थानातील अब्जाधीश टॉप 10 मध्ये नाही
हिंदुस्थानातील एकाही अब्जाधीशाचा पहिल्या 10 मध्ये समावेश नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी 112 अब्ज डॉलर संपत्तीसह 11 व्या स्थानावर आहेत. तर गौतम अदानी या यादीत 14 व्या क्रमांकावर आहेत.
टेस्लाचे शेअर्स घसरले
टेस्ला पंपनीचे शेअर्स घसरल्याने एलन मस्क यांना मोठा फटका बसला आहे. 2024 च्या वर्षात आतापर्यंत त्यांच्या शेअर्समध्ये जवळपास 33.62 टक्क्यांची घसरण झाली. टेस्लाने कमी किमतीची कार लाँच करण्याची योजना रद्द केल्याने टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. तसेच मागील तीन महिन्यांत टेस्लाच्या वाहन विक्रीतसुद्धा घसरण
झाली आहे.
जगातील टॉप 10 सर्वात श्रीमंत
– बर्नार्ड अर्नाल्ट– एलव्हीएमएच
– जेफ बेझोस – अॅमेझॉन
– मार्क झुकरबर्ग – मेटा
– एलन मस्क – टेस्ला
– बिल गेट्स – मायक्रोसॉफ्ट
– स्टीव्ह बाल्मर– मायक्रोसॉफ्ट
– वॉरन बफे – बर्कशायर हॅथवे
– लॅरी पेज – गुगल
– लॅरी एलिसन – ओरॅकल
– सर्जी ब्रिन – गुगल
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List