धक्कादायक….पतीच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीच्या दुःखाचा कडेलोट; गळफास घेत संपवले जीवन

धक्कादायक….पतीच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीच्या दुःखाचा कडेलोट; गळफास घेत संपवले जीवन

नांदेडच्या नरसीफाटजवळ धक्कादायक घटना घडली आहे. पतीचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीला दुःख असह्य झाले. पतीच्या मृत्यूचे दुःख आणि निराशेच्या भरात तिने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले आहे. ही घटना शनिवारी रात्री बेंद्री (ता.नायगाव) येथे घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

बेंद्री येथील अरुण बाबुराव बेंद्रीकर हे विष्णुपुरी (नांदेड ) येथील महावितरण कार्यालयात नोकरीला होते. काम संपल्यावर शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीने आपल्या गावी बेंद्रीकडे परतत होते. गावाजवळ मांजरम कॉर्नर येथे त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात अरुण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने नांदेडला नेण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पतीच्या अपघाताचे वृत्त कळताच अरुण यांची पत्नी स्नेहा कुटुंबियांसह पतीला भेटण्यासाठी नांदेडच्या रुग्णालयात आली होती. अरुण यांच्यावर उपचार सुरु असल्याचे त्यांना सांगण्यात आले. नातेवाईकांनी त्यांची समजूत काढत त्यांना बेंद्री येथील घरी पाठवले. मात्र, अपघातात पतीचा मृत्यू झाल्याची कुणकुण स्नेहा यांना लागली होती. हे दुःख त्यांना सहन झाले नाही. या घटनेच्या त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. या दुःखाच्या आणि निराशेच्या भरात त्यांनी मध्यरात्री घरातील एका खोलीत गळफास घेत जीवनयात्रा सपंवली.

स्नेहा यांनी आत्महत्या केल्याचे समजताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला. काही वेळापूर्वीच पतीचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर काही तासातच पत्नीने गळफास घेत आयुष्य संपविले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण बेंद्री गावात शोककळा पसरली आहे. मृत अरुण व स्नेहा यांना तीन वर्षाचे एक अपत्य असून आई, वडील, दोन भाऊ असा परिवार त्यांच्या पश्चात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;