पैसा आणि यंत्रणांच्या जोरावर लोकशाही संपवण्याचा भाजपचा डाव; प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराला आता वेग येत आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांककडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैकी झडत आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे. सरकारी यंत्रणा आणि पैशाच्या जोरावर देशातील लोकशाही संपवण्याचा भाजपचा डाव आहे. त्यामुळे ही निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपण हिमाचल प्रदेशमधील पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांची एकजूट, निवडणूक लढण्याची तयारी आणि पक्षासाठी असलेली समर्पण भावना याचा आपल्याला अभइमान आहे. एकीकडे भाजपची भीती, दबाव, प्रलोभन आणि खोट्यांचे साम्राज्य आहे. सरकारी यंत्रणा आणि पैशांचा वापर करत लोकशाही संपवण्यासाठी त्यांचे राजकारण सुरू आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष सत्य, साहस, धैर्याने जनतेसाठी एथक परिश्रम करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे जनता आम्हालाचा पाठिंबा देईल आणि आमचा विजय होईल, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
हिमाचल प्रदेश में कांग्रेस पार्टी के सभी नेताओं से मैं मिली। उनकी एकजुटता, मेहनत, मजबूती से चुनाव लड़ने के जज्बे और जनता के प्रति उनके समर्पण पर मुझे गर्व है।
एक तरफ भाजपा का भय, लालच और झूठ का साम्राज्य है। धनबल और एजेंसियों के माध्यम से सत्ता के लिए लोकतंत्र को ख़त्म करने…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 7, 2024
ही निवडणूक देशासाठी आणि देशातील लोकशाहीसाठी महत्त्वाची ठरणार असून जनता आता आमच्या पाठिशी आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List