बँकेचे बोगस ऑनलाइन मेसेजेस कसे ओळखाल?
ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी दिल्ली पोलीस ग्राहकांच्या मदतीला धावून आले आहेत. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही पह्टो शेअर केले असून ऑनलाइन बँकिंग मेसेजला ओळखण्याची सोपी ट्रिक सांगितली आहे.ऑनलाइन स्पॅमर्स फिशिंग अटॅकसाठी सीरिलिक स्क्रिप्टचा वापर करतात. त्यामुळे कोणतीही लिंक उघण्याआधी त्याची यूआरएल लक्षपूर्वक पाहा, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दोन लिंक शेअर केल्या. त्यामुळे कोणतीही लिंक काळजीपूर्वक पाहा. यात स्पेलिंग मिस्टेक हमखास असते. स्पॅमर्स वेबसाईटच्या लिंकमध्ये खास सिम्बॉल, स्पेशल पॅरेक्टर टाकून लिंक बनवले जाते. त्याला अनेक जण बळी पडतात. परंतु ग्राहकांनी अशा लिंक दिसल्यास त्यावर क्लिक करू नका, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
असे राहा सुरक्षित
अनोळखी व्यक्तीने किंवा परिचित व्यक्तीने कोणतीही लिंक पाठवल्यास त्या लिंकची स्पेलिंग तपासा. वेब साईटच्या नावात स्पॅमर्स बदल करतात. जर थोडा जरी संशय आला तर गुगलवर जाऊन खरी लिंक तपासा. वेब साईटच्या खाली युजर्संच्या कमेंट वाचा. अनेक वेळा युजर्सला दगाफटका बसल्यानंतर ते कमेंट करून सांगत असतात. कोणतीही लिंक ओपन करताना अजिबात घाई करू नका अन्यथा तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List