मिस्त्री बंधू फोर्ब्सच्या तरुण अब्जाधीशांच्या यादीत
फोर्ब्सने नुकतीच जगातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली असून या यादीत 30 वर्षांखालील 25 तरुण अब्जाधीश आहेत, ज्यांचे वय 33 किंवा त्यापेक्षा कमी आहे. या सर्वांची एकूण संपत्ती 110 अब्ज डॉलर असून काहींना ही संपत्ती वारस हक्काने, तर काहींना मेहनतीच्या जोरावर मिळालीय. विशेष म्हणजे तरुण अब्जाधीशांच्या यादीत 25 वर्षीय जहान मिस्त्र्ााr आणि 27 वर्षीय फिरोज मिस्त्र्ााr यांचा समावेश आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्र्ााr यांची ती मुले असून त्यांची एकत्रित संपत्ती 9.8 अब्ज डॉलर आहे. म्हणजेच प्रत्येकाला वारस हक्काने 4.9 अब्ज डॉलर इतकी संपत्ती मिळालीय. जहान आणि फिरोज हे दोघेही आयर्लंडचे नागरिक असून ते मुंबईत वास्तव्यास आहेत. सायरस मिस्त्र्ााr यांचा कार अपघातात झालेल्या मृत्यूनंतर कुटुंबाचा टाटा सन्समधील 18.4 टक्के हिस्सा दोघांना वारसा हक्काने मिळाला.
जहान मिस्त्री यांनी येल युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे. टाटा सन्समधील भाग भांडवलातून त्यांना 150 अब्ज महसूल मिळतो. याशिवाय त्यांचे काका अध्यक्ष असलेल्या शापूरजी पालोनजी ग्रुपमधील 25 टक्के भागीदारी त्यांच्याकडे आहे.
फिरोज मिस्त्री यांनादेखील टाटा सन्समधील भागभांडवल आणि शापूरजी पालोनजी ग्रुपमधील 25 टक्के भागीदारी यातून मोठे उत्पन्न मिळते. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही खासगी बांधकाम आणि अभियांत्रिकी फर्म सूचीबद्ध करून निधी उभारण्याच्या योजनांमध्ये फिरोजचा सहभाग आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List