शशी थरूर यांची परदेशी शेअर बाजारात गुंतवणूक; कोट्यवधींची संपत्ती
देशात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वाताववरण तापलेले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता देशातील विविध नेत्यांच्या संपत्तीची माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे मिळत आहे. अनेक नेत्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात वाढ झाली आहे. तसेच काही नेत्यांनी शेअर बाजार आणि म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्याने त्यांना चांगला परतावाही मिळत आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी परदेशी शेअर बाजारात गुंतवणूक केली असून त्यांच्याकडे एकूण 56 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेअर्स बाजार आणि म्युच्युअल फंड्समध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. त्यातून त्यांना चांगला परतावा मिळत आहे. तसेच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्या संपत्तीची माहिती मिळाली आहे. त्यांनी परदेशी शेअर बाजारासह क्रिप्टोकरन्समध्येही गुंतवणूक केली आहे. बिटकॉईन आभासी चलन आहे. त्यांच्याजवळ 5 लाख 11 हजार 314 रुपयांचे बिटकॉईन्स आहेत.
कॉर्पोरेटेड बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्योरिटीमध्येही थरुर यांनी गुंतवणूक केलेली आहे. तसेच त्यांनी परदेशी शेअर बाजारात 9.33 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे 3.46 कोटी रुपयांचे कार्पोरेट बॉण्ड्स आहेत. तसेच 2 कोटी रुपयांचे यूएस ट्रेजरी सिक्योरिटीज आहे. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटद्वारे त्यांनी 91.7 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच थरुर यांच्यावर 1.1 कोटी रुपयांचे कर्ज आहे. थरुर यांच्याकडे 36 हजार रुपये रोख स्वरुपात आहेत. त्यांच्याकडे 49.3 कोटी रुपयांची जंगम तर 6.75 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. म्हणजेच त्यांची एकूण संपत्ती ही 56 कोटी रुपयांपेक्षाही अधिक असल्याची माहिती त्यांच्या पतिज्ञापत्रातून मिळाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List