प्रेग्नेंसी काळात दीपिका पादुकोण हिची अशी पोस्ट! ‘अधिक प्रार्थना करा आणि…’

प्रेग्नेंसी काळात दीपिका पादुकोण हिची अशी पोस्ट! ‘अधिक प्रार्थना करा आणि…’

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने सोशल मीडियावर प्रेग्नेंसीची घोषणा केली. दरम्यान, प्रेग्नेंसी काळात दीपिका हिने एक क्रिप्टिक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ‘प्रार्थना अधिक करा आणि तक्रारी कमी करा…’ असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवर दीपिका हिने एक नोट शेअर केली आहे. नोटमध्ये ‘कमी पोस्ट करा, काम अधिक करा… तुलना कमी करा, अधिक प्रतिबिंबित करा… अधिक प्रर्थना करा, तक्रारी कमी करा… चर्चा कमी करा, अधिक साध्य करा…’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका पादुकोण हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

दीपिका पादुकोण – रणवीर सिंग यांच्या घरी होणार नव्या पाहुण्याची एन्ट्री

काही दिवसांपूर्वी दीपिकाने प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दीपिका – रणवीर यांच्या पहिल्या बाळाचा जन्म सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहे. महिन्याच्या शेवटी अभिनेत्री बाळाला जन्म देईल. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून दीपिका हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली होती.

 

 

दीपिका – रणवीर यांचं लग्न

दीपिका – रणवीर यांची पहिली भेट दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्या ‘राम लिला’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. अखेर दोघांच्या पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका – रणवीर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नाच्या 6 वर्षांनंतर दोघांना आई-वडील होण्या निर्णय घेतला.

सांगायचं झालं तर, लग्नाआधी आणि लग्नानंतर देखील दीपिका – रणवीर यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘गोलियों की रासलीला: रामलीला’, ’83’ आणि ‘सर्कस’ यांसारख्या सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. आता दोघे ‘सिंघम अगेन’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीय येणार आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणवीर – दीपिका यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;