Lok Sabha Election 2024 : सीडीफेम नाथाभाऊंची विकेट पडली

Lok Sabha Election 2024 : सीडीफेम नाथाभाऊंची विकेट पडली

तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन, अशी भाजपला धमकी देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीची साथ सोडून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. पण अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. एकनाथ खडसे यांनी चार वर्षांपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना विधान परिषदेवर पाठवले होते. पण आता केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे जावई अनेक महिने जेलमध्ये होते. त्यांना अलीकडेच जामीन मिळाला आहे. पण एकनाथ खडसे यांना 137 कोटी रुपयांच्या गौण खनिजप्रकरणी सतत नोटिसा येत होत्या, पण भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेनंतर त्यांना नोटीसा पाठवणे बंद झाले.

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेटही घेतली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तबच झाले. आता लवकर त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त होणार आहे. मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्यावर उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे नेते गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून येणार अशी चिन्हे आहे. कारण या दोन नेत्यांमधील जाहीर वाद अनेकदा चव्हाटय़ावर आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;