पश्चिम बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला; शेकडो ग्रामस्थांचा घेराव, दगडफेकीत दोन अधिकारी जखमी

पश्चिम बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला; शेकडो ग्रामस्थांचा घेराव, दगडफेकीत दोन अधिकारी जखमी

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मिदनापूर जिह्यात एनआयएचे पथक तपासासाठी आले असता शेकडो ग्रामस्थांच्या जमावाने त्यांच्यावर अचानक दगडफेक केली. तसेच पथकातील वाहनांची तोडपह्ड करण्यात आली. यामध्ये दोन अधिकारी किरकोळ जखमी झाले. या प्रकारामुळे पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्याच्या घरी 2022 मध्ये झालेल्या बॉम्बस्पह्ट  झाला होता. या प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशावरून एनआयएकडून अधिक तपास सुरू आहे. बॉम्बस्फोटासंदर्भातील चौकशीसाठी एनआयएकडून संशयितांना नोटिसा देण्यात आल्या होत्या, मात्र ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. एनआयएचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी भूपतीनगरमध्ये आले असता संतप्त जमावाने त्यांच्यावर हल्ला केला.

एनआयएचं पथक संशयितांना घेऊन माघारी परतत असताना ग्रामस्थांच्या जमावाने त्यांचे वाहन अडवले. तसेच त्यांना सोडण्याची मागणी केली. मात्र एनआयएच्या पथकाने त्यास नकार देताच जमाव संतप्त झाला आणि पथकाच्या वाहनावर हल्ला केला. यात कारच्या काचा फुटून एनआयएचे दोन अधिकारी जखमी झाले, मात्र एनआयएचे पथक जमावाच्या तावडीतून सुटून पोलीस ठाण्यात पोहोचण्यामध्ये यशस्वी झाले.

मध्यरात्री छापा का टाकला?

एनआयएने मध्यरात्री छापा का टाकला? त्यांनी पोलिसांची परवानगी घेतली होती का? मध्यरात्री आलेल्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीला जशी प्रतिक्रिया द्यायला हवी होती, तशीच स्थानिकांनी दिली. निवडणुकीच्या आधी लोकांना अटक का करत आहेत? भाजपाला असे वाटते की ते प्रत्येक बूथ एजंटला अटक करतील? यासाठी एनआयएला काय अधिकार आहेत? असा सवाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

महिलांवर हल्ला केल्याचा दावा

एनआयएच्या अधिकाऱयांनी भूपतीनगरमध्ये महिलांवर हल्ला केल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, ‘एनआयएचे अधिकारी लोकांच्या घरात घुसत असतील तर तुम्हाला काय अपेक्षा आहे? भाजपाला पाठिंबा देण्यासाठी हे सर्व केले जात आहे, पण आम्ही सर्वांना आवाहन करतो की, भाजपाच्या या अशा पद्धतीच्या राजकारणाविरोधात लढा’.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;