डेडलाइन गाठण्यासाठी आता रात्रीही नालेसफाई, 31 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आव्हान

डेडलाइन गाठण्यासाठी आता रात्रीही नालेसफाई, 31 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आव्हान

दरवर्षी मार्चच्या सुरुवातीला सुरू होणारी नालेसफाई या वर्षी तिसऱया आठवडय़ानंतर सुरू झाल्यामुळे संपूर्ण काम 31 मेपर्यंत पूर्ण करण्यासाठी मोठय़ा नाल्यांची सफाई रात्रीदेखील करण्यात येत आहे. तर छोटय़ा नाल्यांची सफाई दोन शिफ्टमध्ये करण्यात येत आहे. सद्यस्थितीत शहर विभागात सुमारे 5 टक्के आणि पूर्व-पश्चिम उपनगरात 10 टक्के नालेसफाई झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

पालिकेकडून दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासून मोठे नाले, छोटे नाले, गटारे आणि पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई केली जाते. मात्र या वर्षी निविदा प्रक्रिया रखडल्याने पहिल्या आठवडय़ात सुरू होणारे काम उशिरा सुरू झाले. मात्र आता मोठय़ा आणि छोटय़ा अशा सर्व नाल्यांच्या सफाईच्या कामांची वर्क ऑर्डर दिल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 31 मेपर्यंत काम पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावाही पालिकेने केला आहे.

नालेसफाईवर सीसीटीव्हीची नजर

– नालेसफाईच्या कामावर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार असून सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही नजर ठेवली जाणार आहे. कामावर नजर ठेवण्यासाठी सब इंजिनीयरची नेमणूकही केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

– शिवाय गाळ काढल्यानंतर शहराबाहेर विल्हेवाटीसाठी नेण्याआधी रिकाम्या डंपरचा फोटो, डंपर भरल्यानंतर फोटो आणि डंपर रिकामा केल्यानंतरचा फोटोही घेतला जाणार आहे. त्यामुळे नालेसफाई परिणामकारक होणार असल्याचा पालिकेचा दावा आहे.

असे होते काम

– मुंबईतील एकूण नालेसफाईच्या कामापैकी 75 टक्के काम पावसाळ्याच्या आधी 31 मेपर्यंत पूर्ण केले जाते. तर पावसाळ्यात 10 टक्के तर पावसाळ्यानंतर 15 टक्के नालेसफाई केली जाते.

मुंबईतील नाले

छोटे नाले – 1508 (लांबी 605 कि.मी.)

मोठे नाले – 309 ( लांबी 290 कि.मी.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;