भूमिपुत्रांना आपल्याच जागेत जाण्यास मज्जाव, चिनी ड्रगनने हिंदुस्थानचा भूभाग गिळला

भूमिपुत्रांना आपल्याच जागेत जाण्यास मज्जाव, चिनी ड्रगनने हिंदुस्थानचा भूभाग गिळला

देशातील कॉर्पोरेट कंपन्यांनी लडाखची दीड लाख चौरस किलोमीटर कुरण जमीन बळकावली असताना चीननेदेखील गेल्या पाच वर्षांत हिंदुस्थानचा मोठा भूभाग गिळला आहे. भूमिपुत्र गुराख्यांना या जागेत जाण्यापासून चिनी सैनिक अडवत आहेत. या गंभीर गोष्टीकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असून देशापासून सत्यही लपवल्याचा खळबळजनक आरोप पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांनी केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे दुर्लक्ष आणि चीनच्या मुजोरीविरोधात वांगचुक उद्या 7 एप्रिल रोजी हिंदुस्थान-चीन सीमेवर धडक मोर्चा काढणार आहेत. हिंदुस्थानची किती जागा चीनने बळकावली हे या मोर्चातून दाखवणार आहेत.

सोनम वांगचुक यांनी विविध मागण्यांसाठी 21 दिवसांचे उपोषण केले होते. त्यानंतर त्यांनी आता मोर्चाची घोषणा केली असून चीनच्या सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात लडाखचे 10 हजार लोक सहभागी होतील, असेही वांगचुक यांनी सांगितले आहे. भाजपने 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही लडाखला स्वतंत्र दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. मागील वर्षी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पुन्हा तेच आश्वासन दिले गेले, पण ना हे आश्वासन पूर्ण केले गेले, ना त्या दिशेने ठोस पावले टाकली गेली. आता तर लेहमध्ये सहावे परिशिष्ट असा शब्द उच्चारणाऱयांवर दडपशाही केली जाते, असा आरोप वांगचुक यांनी केला आहे.

मोर्चाचा प्रशासनाने घेतला धसका

सीमारेषेवर जाणाऱया या मोर्चाचा धसका प्रशासनाने घेतला असून मोर्चात लोकांनी सहभागी होऊ नये, असा प्रयत्न केला जात आहे. लेह-लडाखमध्ये 24 तासांसाठी इंटरनेटचा स्पीड 2 जी पर्यंत प्रतिबंधित केला. जिल्हाधिकाऱयांच्या परवानगीशिवाय मोर्चा काढता येणार नाही, असे आदेश दिले आहेत.

अशा आहेत मागण्या

– सध्या केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला राज्यघटनेतील सहाव्या परिशिष्टानुसार पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा.
– लडाखमध्ये सध्या लोकसभेची एक जागा आहे. त्या दोन कराव्यात, राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळावे.
– लडाखमध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना करावी, अशा प्रमुख मागण्या वांगचुक यांनी केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;