श्री काशी विश्वनाथ मंदिराचे फेसबुक पेज हॅक, हॅकर्सनी टाकले आक्षेपार्ह फोटो

श्री काशी विश्वनाथ मंदिराचे फेसबुक पेज हॅक, हॅकर्सनी टाकले आक्षेपार्ह फोटो

श्री काशी विश्वनाथ मंदिराचे अधिकृत फेसबुक पेज शनिवारी सकाळी सायबर हॅकर्सनी हॅक केले. हॅकर्सनी फेसबुक पेजचा पासवर्डही बदलला आणि मंदिराच्या फेसबुक स्टोरीवर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड केल्या होत्या.

मंदिराकडू सकाळी मंगला आरतीचा फोटो अपलोड केल्यानंतर साडेदहा वाजता पुढील आरतीचा फोटो पोस्ट करण्यासाठी पेज उघडायचे होते. मात्र पासवर्ड बदलल्याने मंदिर प्रशासनाला तो फोटो अपलोड करतका आला नाही मात्र त्याच वेळी मंदिराच्या पेजवर काहीतरी आक्षेपार्ह पोस्ट झाल्यचे समजले. मंदिराचे फेसबुक पेज हॅक होताच एकच खळबळ उडालीहोती.त्यानंतर मंदिर प्रशासनाने पोलीस आणि सायबर सेलला या प्रकरणाची माहिती दिली.सध्या मंदिराचे फेसबुक पेज रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सायबर गुन्हेगारांची ओळख पटवून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;