मुले चोरणार्‍या तस्कर टोळीचे सात जण अटकेत; सीबीआयची कारवाई, तीन बालके सापडली

मुले चोरणार्‍या तस्कर टोळीचे सात जण अटकेत; सीबीआयची कारवाई, तीन बालके सापडली

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशभरात लहान मुलांची तस्करी करणार्‍या टोळीचा पदार्फाश केला. तपास यंत्रणेने दिल्ली व हरयाणात 7 ठिकाणी छापेमारी करत दिल्लीतील केशवपुरम येथील घरातून तीन नवजात बालकांची सुटका केली. यादरम्यान छापेमारीत सात जणांना अटक केली असून, जवळपास  4 ते 5 लाख रुपयांना एक बालक विक्री करत असल्याचे समोर आले.

तीन नवजात बालकांमध्ये दोन मुले असून, त्यापैकी एक दीड दिवसांचा, तर दुसरा 15 दिवसांचा आहे. एक मुलगी साधारण एक महिन्यांची आहे. सीबीआयने हॉस्पिटलच्या वॉर्डबॉयसह ७ जणांना अटक केली आहे. यामध्ये अनेक महिलांचा समावेश आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना एनसीआर भागातून पकडण्यात आले आहे. हे लोक हॉस्पिटलमधून नवजात बालके चोरायचे. मग त्यांची काळ्याबाजारात मालासारखा सुमारे  4 ते 5 लाख रुपयांचा सौदा व्हायचा. मार्च महिन्यात सुमारे 10 मुलांची विक्री झाल्याचे समोर आले. शोध मोहिमेदरम्यान साडेपाच लाख रुपये रोख आणि अनेक कागदपत्रांसह आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या. सीबीआय अनेक राज्यांमध्ये बालतस्करी प्रकरणाचा तपास करत आहे. देशातील अनेक मोठी रुग्णालये बालतस्करीच्या रॅकेटच्या कचाट्यात आली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;