Lok Sabha Election 2024 : मी साहेबांसोबतच, रोहिनी खडसे यांनी फुंकली तुतारी
एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असताना त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबतच राहणार असल्याचे जाहीर केले आहे. रोहिणी खडसे यांनी ट्विटरवरून याबाबत ट्विट करत माहिती दिली.
”मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच … लढ़ेंगे और जीतेंगे”, असे ट्विट त्यांनी केले आहे.
मी घरी जातोय – एकनाथ खडसे
एकनाथ खडसे यांनी सकाळ माध्यमाशी बोलताना ते घरवापसी करत असल्याचे सांगितले. ”मी लवकरच भाजपमध्ये घरवापसी करणार आहे. आज नाही मात्र लवकरच करेन. भाजप हे माझं घर आहे. मी घरी जातोय. ते मी बांधलं आहे, असं खडसे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List