त्यांनी मध्यरात्री छापा टाकला, त्यामुळे… ममता बॅनर्जी यांनी सुनावले खडेबोल
2022मध्ये झालेल्या एका बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या एनआयएच्या पथकावर जमावाने दगडफेक केल्याचे समोर आले आहे. हे पथक तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या घऱी गेले होते. त्यावेळी या पथकाला टीएमसी समर्थक जमावाच्या रोषाचा सामना करावा लागला.
या प्रकरणावर बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. ”एनआयएच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री छापा का टाकला? छापा टाकण्याआधी त्यांनी पोलिसांना कळवले होते का त्यांची परवानगी घेतली होती का?, असे सवाल यावेळी ममता बॅनर्जी यांनी केले आहेत. तसेच मध्यरात्री आलेल्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीला जशी प्रतिक्रिया द्यायला हवी होती, तशीच स्थानिकांनी दिली. निवडणुकीच्या आधी लोकांना अटक का करत आहेत? भाजपाला असे वाटते की ते प्रत्येक बूथ एजंटला अटक करतील? यासाठी एनआयएला काय अधिकार आहेत? असा सवाल करत ममता बॅनर्जी यांनी भाजपला खडेबोल सुनावले.
या अधिकाऱ्यांनी महिलांवर हल्ला केल्याचा आरोप देखील ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ”भाजपला पाठिंबा मिळावा म्हणून एनआयएचे अधिकारी या धाडी टाकत आहेत. मी सर्वांना आवाहन करते की भाजपच्या या राजकारणाविरोधात आपण सर्वांनी लढा द्यायला हवा, असे मता बॅनर्जी यांनी म्हटले.
2022मध्ये झालेल्या एका बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनआयएचे अधिकारी टीएमसी नेत्याच्या घरी पोहोचले होते. मात्र या पथकाला टीएमसी समर्थक जमावाच्या रोषाचा सामना करावा लागला. जमावाने एनआयएच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. यात एनआयए पथकाच्या गाडीचे नुकसान झाले असून अधिकारीही जखमी झाला आहे. शनिवारी पहाटे साडे पाचच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
एनआयएचे अधिकारी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य संशयित मोनोब्रोतो जाना याला अटक करण्यासाठी पोहोचले होते. मात्र याचवेळी या पथकावर हल्ला झाला. या प्रकरणी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोनोब्रोतो जाना, त्यांच्या कुटुंबिय आणि अज्ञातांविरुद्ध भादवि कलम 341, 332. 352, 186, 323, 427, 34 आणि पीडीपीपी कायदा कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List