‘शका लाका बूम बूम’मधील ‘संजू’ आठवतोय? आता त्याला ओळखणंही कठीण
स्टार प्लस वाहिनीवर येणारी 'शका लाका बूम बूम' ही मालिका आठवतेय का? लहान मुलांमध्ये ही मालिका खूप लोकप्रिय होती. या मालिकेत संजूची भूमिका साकारलेल्या मुलाला खूप प्रसिद्धी मिळाली. संजू आणि त्याची जादुई पेन्सिल ही लहान मुलांमध्ये खूप लोकप्रिय होती.
'शाका लाका बूम बूम'मध्ये किंशुक वैद्यने संजूची भूमिका साकारली होती. आता हाच संजू डॅशिंग हिरो बनला आहे. विविध म्युझिक व्हिडीओ, टीव्ही शोज आणि सोशल मीडियावरील डान्स व्हिडीओद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. किंशुकचा बदललेला लूक पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.
किंशुकने वयाच्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 'धांगड धिंगा' या मराठी चित्रपटातून त्याने अभिनयाला सुरुवात केली आणि त्यानंतर तो 'राजू चाचा' या बॉलिवूड चित्रपटात झळकला. मात्र 'शाका लाका बूम बूम' या मालिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
'शाका लाका बूम बूम' या मालिकेनंतर किंशुकने अभिनयातून पूर्णपणे ब्रेक घेतला आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं. त्यानंतर 'एक रिश्ता साझेदारी का' या मालिकेतून त्याने टीव्हीवर पुनरागमन केलं. किंशुक सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून इन्स्टाग्रामवर तो विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List