पश्चिम बंगालमध्ये NIA च्या पथकावर हल्ला, TMC नेत्याच्या घरी तपासादरम्यान दगडफेक

पश्चिम बंगालमध्ये NIA च्या पथकावर हल्ला, TMC नेत्याच्या घरी तपासादरम्यान दगडफेक

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकावर हल्ला झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी तपासासाठी पोहोचलेल्या एनआयएच्या पथकावर जमावाने दगडफेक केल्याचे समोर आले आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

2022मध्ये झालेल्या एका बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनआयएचे अधिकारी टीएमसी नेत्याच्या घरी पोहोचले होते. मात्र या पथकाला टीएमसी समर्थक जमावाच्या रोषाचा सामना करावा लागला. जमावाने एनआयएच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. यात एनआयए पथकाच्या गाडीचे नुकसान झाले असून अधिकारीही जखमी झाला आहे. शनिवारी पहाटे साडे पाचच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

एनआयएचे अधिकारी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य संशयित मोनोब्रोतो जाना याला अटक करण्यासाठी पोहोचले होते. मात्र याचवेळी या पथकावर हल्ला झाला. या प्रकरणी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोनोब्रोतो जाना, त्यांच्या कुटुंबिय आणि अज्ञातांविरुद्ध भादवि कलम 341, 332. 352, 186, 323, 427, 34 आणि पीडीपीपी कायदा कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;