वय अवघे 19 वर्षे; संपत्ती 1.1 अब्ज डॉलर्स
नुकत्याच जारी झालेल्या फोब्र्स बिलियनेयर्स लिस्ट 2024 मध्ये जगातील सर्वात तरुण अब्जाधीश होण्याचा मान ब्राझीलच्या तरुणीला मिळाला आहे. या तरुणीचे वय केवळ 19 वर्षे असून ती जगातील सर्वात तरुण अब्जाधीश ठरली आहे. या तरुणीचे नाव लिविया वोइगट असून 25 तरुणीच्या यादीत ती आहे. ती लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठय़ा विद्युत मोटर निर्मात्यांपैकी कंपनीची उत्तराधिकारी आहे. ती या कंपनीत सर्वात मोठी शेअरहोल्डर आहे. या कंपनीची स्थापना तिचे आजोबा वर्नर रिकार्डो वोइगट यांनी केली होती. तिची एकूण संपत्ती 1.1 बिलियन डॉलर आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List