…म्हणून नाटकाचा प्रत्येक प्रयोग महत्त्वाचा!

…म्हणून नाटकाचा प्रत्येक प्रयोग महत्त्वाचा!

 

अभिनेता संकर्षण कऱहाडे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. नाटय़ प्रयोगादरम्यान आलेले अनेक अनुभव तो सोशल मीडियावर आवर्जून शेअर करतो. ‘नाटकातला संसार’ असे म्हणत नुकतीच त्याने एक पोस्ट शेअर केली असून ती व्हायरल होत आहे. आपल्या बॅकस्टेज सहकलाकाराचा पह्टो शेअर करत संकर्षणने म्हटलेय, आज आमच्या ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘नियम व अटी लागू’ नाटकाला बॅकस्टेजचे काम करणारा अक्षय पवार नवा नवा संसार सुरू करून भेटायला आला. बायकोची ओळख करून दिली आणि म्हणाला, सोनाली, दादाला नमस्कार कर. इतके गोड वाटले. पुढे संकर्षण म्हणाला, नाटक हे तसे अनिश्चिततेचे माध्यम…पण नेटाने, चिकाटीने, सातत्याने नाटक केले तर नाटक खूप काही देते. आज बॅकस्टेज करणाऱया या मुलाने आयुष्यातले मोठे पाऊल नाटकाच्या जिवावर उचलले, संसार सुरू केला. म्हणून प्रत्येक प्रयोग महत्त्वाचा. कारण त्या एका-एका प्रयोगावर एका-एका कुटुंबाचा घरी संसार सुरू असतो. असे अनेक संसार सुखी करण्यासाठी ‘नाटक’ फार फार महत्त्वाचे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;