पुण्यात नऊ हजार जोडप्यांचे ‘हम दो हमारे पाच’
शहरातील नऊ हजार जोडप्यांना पाच किंवा त्याहून अधिक अपत्य असल्याची बाब महापालिकेने केलेल्या एका कुटुंब सर्वेक्षणातून समोर आली आहे. आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षणात जननक्षम जोडप्यांची माहिती नुकतीच संकलित करण्यात आली. यातून ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात शहरात चार लाख 46 हजार पात्र जननक्षम जोडपी आढळून आली. त्यापैकी दोन टक्के जोडप्यांना पाच किंवा त्याहून अधिक अपत्य असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय 27 टक्के जोडप्यांना एक अपत्य, 21 टक्के जोडप्यांना दोन किंवा तीन, सात टक्के जोडप्यांना चार अपत्य असल्याचे आढळून आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List