हिंदुस्थानींसाठी अमेरिकन व्हिसा झाला सोपा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हिंदुस्थानी नागरिकांना अमेरिकेत प्रवेश देण्यासाठी नवीन व्हिसा श्रेणीची सुरुवात केली आहे. जूनअखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू होणाऱया ई-1, ई-2 श्रेणीत 40 हजार हिंदुस्थानी नागरिकांना अर्ज करता येणार आहे. त्यासाठी अमेरिकेने हिंदुस्थानला ट्रीटी पंट्री (सामंजस्य करार असलेला देश) असा दर्जा दिला. त्यामुळे आता एच-1 बी वर्क व्हिसासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या सुमारे तीन लाख हिंदुस्थानी नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. एच-1 बी व्हिसाची प्रतीक्षा करणारे हिंदुस्थानी आता ई-1 किंवा ई-2 मध्येही अर्ज करू शकतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List