चढली की मी जेवण बनवतो!
अभिनेता अक्षयकुमार काही वर्षांपूर्वी सलमान खानच्या ‘दस का दम’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमातील जुनी क्लिप सध्या व्हायरल होत आहे यात ‘नशेत असताना मी माझ्या लायकीवर येतो आणि जेवण बनवतो’, असे अक्षय म्हणत आहे. अक्षयकुमार हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. दारू आणि सिगारेटपासून तो चार हात लांबच राहतो. पण एकदा अक्षयने खुलासा केला होता की, वाईन प्यायल्यानंतरही त्याला नशा चढते. तेव्हा तो काय करतो याबाबत एक मजेदार किस्सा त्याने सांगितला. अक्षय म्हणाला, मी थोडी जरी वाईन प्यायली तरी मला नशा चढते. नशेत लोक खूप काही करतात. काही गातात, काही पडतात पण मी जेवण बनवायला सुरुवात करतो. तेव्हा मी माझ्या लायकीवर येतो. अक्षयच्या या उत्तरावर एकच हशा पिकला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List