120 तास उपाशी होतो! नारायण मूर्ती यांनी सांगितली संघर्ष गाथा

120 तास उपाशी होतो! नारायण मूर्ती यांनी सांगितली संघर्ष गाथा

हिंदुस्थानातील अव्वल श्रीमंतांपैकी एक असलेले आयटी क्षेत्रातील दिग्गज, इन्पहसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्यावर एकेकाळी युरोपमध्ये तब्बल 120 तास उपाशी राहण्याची वेळ आली होती. नारायण मूर्ती यांनी स्वतः आपल्या आयुष्यातील संघर्षाची माहिती एका कार्यक्रमात दिली.

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघ आणि हिंदुस्थानच्या स्थायी मिशनने विशेष कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता. या वेळी ‘अन्न सुरक्षा आणि हिंदुस्थानचे शाश्वत विकासाचे ध्येय’ या विषयावर नारायण मूर्ती यांचे व्याख्यान झाले. त्यामध्ये नारायण मूर्ती म्हणाले, सुमारे 50 वर्षांपूर्वी मी युरोपमध्ये फिरत असताना मला सलग तब्बल 120 तास उपासमार सहन करावी लागली. तुमच्यापैकी हे अनेकांना माहीत नाही.

पाच दशकांपूर्वी मी युरोपमधील निश नावाच्या शहरात जात होतो. हे शहर बुल्गारिया आणि तत्कालीन युगोस्लाव्हिया व आजचे सर्बिया यांच्या सीमेवर वसलेले आहे.

हिंदुस्थानींना आणि मलाही हिंदुस्थान सरकारमुळे उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले. त्यामुळे आज सुसंस्कृत लोक म्हणून आपण आपल्या राष्ट्राप्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. यासोबतच असहाय, गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी मदत केली पाहिजे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;