भाजपकडून सांप्रदायिक अराजकता माजवून देश तोडण्याचे काम, रमेश चेन्नीथला यांची टीका
देशात सत्ता काबीज करण्यासाठी जातीजातींमध्ये भांडणे लावून भाजप दुफळी निर्माण करत आहे. संपूर्ण देशाची लूट करून केवळ उद्योगपतींचे खिसे भरले जात आहे. देशातील सांप्रदायिक वातावरण बिघडवून देश तोडू पाहणाऱ्या भाजपला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेतून हद्दपार करा व देश वाचवा असा जोरदार प्रहार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाजपावर केला. ते काँग्रेसचे चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि गडचिरोलीचे उमेदवार डॉ. नामदेव कीरसान यांच्या प्रचारार्थ आयोजित चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सभेत बोलत होते.
रात्र वैऱ्याची गाफील राहू नका
देशातील सरकार हे भूलथापाचे राजकारण करून जनतेची फसगत करीत आहे. अशा निष्ठूर सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये गाफिल न राहता महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून निवडणुकीत बरोबरीची टक्कर द्या असे काँग्रेस प्रदेशाध्य्क्ष नाना पटोले म्हणाले
विदर्भातील जागांवर प्रचारासाठी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची विशेष उपस्थिती होती. या दोन्ही सभेस सभेस काँग्रेसचे खासदार मुकुल वासनिक ,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, इंडिया आघाडीचे उमेदवार प्रतिभा धानोरकर, डॉ नामदेव कीरसान तथा महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List