देश गुलामगिरीच्या वाटेवर, भाजपची तानाशाही रोखलीच पाहिजे – विजय वडेट्टीवार

देश गुलामगिरीच्या वाटेवर, भाजपची तानाशाही रोखलीच पाहिजे – विजय वडेट्टीवार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर मध्ये प्रतिभा धानोरकर विजयी होणारच असा विश्वास व्यक्त करत आपल्या विशेष शैलीतून भाजपाचा समाचार घेतला. सत्तेतील मनुस्मृति भाजप सरकारचा संविधान संपवण्याच घाट असून देशातील घटना बदलवून देशाला गुलामगिरीच्या काही लोटण्याचा डाव असल्याचेही ते म्हणाले.इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ देश उभारणीत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

यानंतर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव कीरसान यांच्या प्रचारार्थ गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे आयोजित सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गेल्या दहा वर्षापासून खासदार असलेल्या भाजपचे अशोक नेते यांच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला.

भाजपकडून सांप्रदायिक अराजकता माजवून देश तोडण्याचे काम, रमेश चेन्नीथला यांची टीका

आदिवासींना वनवासी संबोधणाऱ्या तसेच ओबीसींचे आरक्षण हिरावणाऱ्या भाजप सरकारला विजय वडेट्टीवार यांनी खडे बोल सुनावले. जनप्रतिनिधी म्हणून निवडून येणाऱ्या भाजप खासदाराने जनतेचा भ्रमनिरास करून जनतेला वाऱ्यावर सोडून क्षेत्राचा विकास न केल्याने आज भाजप उमेदवारावर नामुष्कीची पाळी आल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;