राजकारण हा ‘वेट अँड वॉच’चा गेम
लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासून नाक्यानाक्यावर फक्त आणि फक्त निवडणुकीची चर्चा होताना दिसते. याच दरम्यान अभिनेत्री सई ताम्हणकर हिने सध्याच्या राजकारणाबद्दल स्पष्ट मत मांडले असून राजकारणात नव्या विचारसरणीची गरज आहे, असे म्हटले आहे.
सईने गुरुवारी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वेळी मीडियाने तिला सध्याच्या राजकारणाविषयी विचारले असता सई म्हणाली, एखादा सिनेमा आल्यावर तो किती कमाई करेल हे सांगू शकत नाही, त्याचप्रमाणे राजकारणात कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. राजकारण हा ‘वेट अँड वॉच’चा गेम आहे. त्यामुळे आपण ते एन्जॉय करायचे असते. राजकारणात सध्या नव्या विचारसरणीची गरज आहे आणि ती राजकारणात येतही आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List