भावोजी आयुष शर्माला सलमानसोबत करायचं नाही काम? सांगितलं कारण

भावोजी आयुष शर्माला सलमानसोबत करायचं नाही काम? सांगितलं कारण

अभिनेता सलमान खानने बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना लाँच केलं. यात त्याची बहीण अर्पिता खानचा पती आयुष शर्माचाही समावेश आहे. मात्र आयुषला इंडस्ट्रीत अपेक्षित असं यश अद्याप मिळालं नाही. आता तो पहिल्यांदाच सलमान व्यतिरिक्त दुसऱ्या बॅनरअंतर्गत निर्मित झालेल्या चित्रपटात काम करतोय. ‘रुसलान’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात तेलुगू अभिनेता जगपती बाबू, विद्या मालवदे आणि नवोदित अभिनेत्री सुश्री मिश्रा उपस्थित होते. यावेळी आयुष सलमानसोबत काम करण्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

माझा प्रवास फार धीम्या गतीने..

आयुषने 2018 मध्ये ‘लव्हयात्री’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र आतापर्यंतचा चित्रपटसृष्टीतील प्रवास हा अत्यंत धीम्या गतीने होत असल्याची खंत त्याने बोलून दाखवली. “मी गेल्या पाच वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करतोय. मला नेहमीच असं वाटलंय की माझा प्रवास हा खूपच धीमा सुरू आहे. पण या प्रवासाचा मी तितकाच आनंद घेतला आहे. लव्हयात्री या चित्रपटानंतर जेव्हा मला समजलं की मी ‘अंतिम’ या चित्रपटात वेगळी भूमिका साकारणार आहे, तेव्हा मला तयारीसाठी जवळपास तीन वर्षे लागली. त्याचवेळी दिग्दर्शक करण बुटानी हे माझ्यासोबत रुसलान या चित्रपटाविषयी चर्चा करायला आले होते. माझ्या मते जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाबाहेरील व्यक्तींसोबत काम करता, तेव्हा तुम्हाला बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळतात”, असं आयुष म्हणाला.

सलमान खान फिल्म्सने मला बिघडवलंय..

‘लव्हयात्री’नंतर आयुषने ‘अंतिम’ या चित्रपटात सलमानसोबत काम केलं. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. सलमान खान फिल्म्स या बॅनरअंतर्गत काम करण्याविषयीही आयुषने सांगितलं. “जर कोणी असा विचार करत असेल की सलमान खान फिल्म्सने मला बिघडवलंय, तर करण सर आणि राधामोहन सर यांनी मला सरळ केलंय. जेव्हा त्यांनी मला अजरबायजान या ठिकाणी 6 अंश सेल्सिअस तापमानात विनाशर्ट उभं केलं होतं, तेव्हा माझ्यातील बिघडलेला मुलगा सरळ झाला (हसतो). पण प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, हा माझा किंवा माझ्या कुटुंबीयांचा उद्देश अजिबात नव्हता की मी फक्त सलमान खान फिल्म्स या बॅनरअंतर्गतच काम करेन. मी सर्वांत आधी अभिनेता आहे, त्यामुळे मला कामाची भूक आहे. मला जमेल तितकं चांगलं काम करायला आवडेल. त्यामुळे चित्रपटाची निर्मिती कोण करतंय, याने फरक पडत नाही”, असं त्याने स्पष्ट केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;