Lok Sabha Election 2024 : मिंधे गरगरले; ठाण्यात ‘डुप्लिकेट मोदी’ आणले
राज्यात भाजपने मिंध्यांची चांगलीच गळचेपी केली आहे. ठाण्यातही ते गरगरले असून कुणीही स्टार प्रचारक नसल्याने मिंध्यांवर ‘डुप्लिकेट मोदी’ प्रचारासाठी आणण्याची वेळ आली आहे. ठाण्यातील मिंध्यांनी स्वतःला ‘नमो सैनिक’ म्हणून आधीच जाहीर केले असून आज झालेल्या मेळाव्यात त्याची प्रचीती आली. या मेळाव्यात चक्क डुप्लिकेट मोदींनी भाषण केले.
ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आज मिंधे व भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात नरेंद्र मोदी यांची वेशभूषा करून एका कलाकाराची एण्ट्री झाली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विकास महंत असे या डुप्लिकेट मोदींचे नाव असून त्यांनी मोदींच्या ढंगात भाषण सुरू केले. मोदींसारखेच हावभाव होते. भाषणात त्यांच्यासारखीच फेकम्फाक करीत मतदारांना आकर्षित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला.
भाषणातही फेकाफेकी
भाई और बहनो.. लोकसभा का बिगूल अब बज चुका है.. अशी भाषणाची सुरुवात डुप्लिकेट मोदींनी केली. एवढेच नव्हे तर केंद्रात आपली सत्ता पुन्हा आल्यानंतर काय कामे करणार याचा पाढादेखील वाचला. आता तुमच्याकडे काहीच ओरिजनल न राहिल्याने यापुढे डुप्लिकेट मालच बाजारात खपवावा लागेल, अशी प्रतिक्रिया ठाणेकरांनी व्यक्त केली आहे. या डुप्लिकेट मोदींना मिंधेवाले लोकसभा निवडणुकीत सर्वत्र फिरवणार असल्याचे बोलले जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List