युकी-ओलिवेटी उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ माराकेच (मोरोक्को)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेला माराकेच पुरुषांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांब्री आणि त्याचा फ्रान्सचा साथीदार अल्बानो ओलिवेटी यांनी दुहेरीत उपांत्य फेरी गाठली आहे.
पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बिगर मानांकित जोडी युकी आणि ओलिवेटी यांनी कोलंबियाच्या तिसऱ्या मानांकित निकोलास बॅरेन्टोस आणि ब्राझीलचा राफेल मॅटोस यांचा 7-6(7-5), 6-7, 10-7 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना दोन तास चालला होता. या सामन्यात भांब्री आणि ओलिवेटी यांनी 10 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. आगामी पॅरीस ऑलिम्पिकसाठी भारताच्या रोहन बोपण्णाने पुरुष दुहेरीकरिता युकी भांब्रीला आपला साथीदार म्हणून निवडला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List