मद्य धोरण घोटाळा भाजपने केला;मोदी सरकारने षडयंत्र रचून केजरीवालांना गोवले, आप नेते संजय सिंह यांचा गौप्यस्फोट

मद्य धोरण घोटाळा भाजपने केला;मोदी सरकारने षडयंत्र रचून केजरीवालांना गोवले, आप नेते संजय सिंह यांचा गौप्यस्फोट

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यामागे भाजपचा हात असल्याचा गौप्यस्फोट आपचे नेते आणि खासदार संजय सिंह यांनी केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एका षडयंत्राखाली अटक करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन संजय सिंह यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.

ईडीने टीडीपी खासदार मंगुटा रेड्डी आणि त्याचे वडील राघव रेड्डी यांच्यावर केजरीवाल यांच्याविरोधात वक्तव्य करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही संजय सिंह यांनी केला. मंगुटा रेड्डी आता पंतप्रधानांचा फोटो लावून निवडणूक लढवत आहेत. तेलगू देसम पक्ष हा एनडीएचा मित्रपक्ष आहे, असेही संजय सिंह म्हणाले. मंगुटा रेड्डी यांना ईडीने पहिल्यांदाच अरविंद केजरीवाल यांना ओळखता का असे विचारले. तेव्हा त्यांनी केजरीवाल भेटले होते, परंतु चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीच्या बाबतीत. त्यानंतर त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली आणि 5 महिने तुरुंगात ठेवल्यानंतर वडिलांनी त्यांचे म्हणणे बदलल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला.

10 फेब्रुवारी ते 16 जुलैपर्यंत राघव मंगुटाचे 7 जबाब घेण्यात आले. यातील 6 विधानांमध्ये त्यांनी केजरीवाल यांच्याविरोधात काहीही जबाब दिला नाही. परंतु 16 जुलै रोजी केलेल्या 7व्या जबाबात त्यांनी आपली भूमिका बदलली आणि मोदी सरकारच्या षड्यंत्राचा भाग बनले. 5 महिन्यांच्या छळानंतर त्यांनी आपले विधान बदलले आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात जबाब दिल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला आहे.

सिसोदिया यांचे तुरुंगातून जनतेला पत्र

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटळाप्रकरणी तिहार कारागृहात बंद असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तुरुंगातूनच आपल्या विधानसभा मतदारसंघातील लोकांना पत्र लिहिले आहे. आपण लवकरच बाहेर भेटू. शिक्षा क्रांती झिंदाबाद, लव्ह यू ऑल असे त्यांनी पत्रात  म्हटले आहे. ते पत्रात म्हणतात, केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत शैक्षणिक क्रांती झाली याचा आनंद आहे. गेल्या वर्षभरापासून येथे बंद आहे. या काळात मला सगळ्यांची आठवण झाली. आम्ही सर्वांनी दिल्लीतील जनतेसाठी प्रामाणिकपणे काम केले. त्या वेळी ब्रिटिशांच्या हुकूमशाहीविरुद्ध प्रदीर्घ लढाई झाली, तशीच आता आम्ही चांगल्या शिक्षणासाठी आणि शाळांसाठी लढाई करत आहोत. इंग्रजही खोटे आरोप करून लोकांना तुरुंगात डांबायचे. त्यांनी गांधीजी आणि नेल्सन मंडेला यांना अनेक वर्षे तुरुंगात ठेवले. ते दोघेही माझे प्रेरणास्थान आहेत, असे सिसोदिया यांनी पत्रात लिहिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;