बंगळुरू बॉम्बस्फोटात हात; भाजपच्या कार्यकर्त्याला अटक, तपासात धक्कादायक माहिती उघड

बंगळुरू बॉम्बस्फोटात हात; भाजपच्या कार्यकर्त्याला अटक, तपासात धक्कादायक माहिती उघड

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च रोजी झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोट प्रकरणाचे धागेदोरे उलगडले असून, धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी साई प्रसाद हा भाजपचा कार्यकर्ता असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्याला अटक केली आहे.

बंगळुरूच्या व्हाइटफिल्ड परिसरातील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेत 1 मार्चला दुपारी 12.50 च्या सुमारास बॉम्बस्फोट झाला. हा आईडी स्फोट होता. या स्फोटात 10 जण जखमी झाले. ‘एनआयए’ने तपास हाती घेतला. सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या दहशतवादी संघटनेशी संबंधित मुझाविर हुसेन शाझीब आणि अब्दुल मतीन ताहा या दोघांना शिवमोगा जिह्यातील तिथहिल्ली गावातून अटक केली. त्यानंतर चिकमंगळूरू जिह्यातून मुझामिल शारिफला अटक केली. ‘एनआयए’ने आणखी आरोपींच्या शोधासाठी कर्नाटक, तामीळनाडू आणि उत्तर प्रदेशातील 18 ठिकाणी छापे टाकले. प्रत्येकी फरारी आरोपांच्या शोधासाठी 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यात आणखी धक्कादायक माहिती उघड झाली असून, साई प्रसाद या भाजप कार्यकर्त्याला अटक केली आहे. साई प्रसादच्या स्फोटाशी संबंधित आरोपींशी काय संबंध आहे? स्फोटके त्याने ठेवली होती का ? याची चौकशी एनआयएकडून सुरू आहे.

प्रत्येक वेळी टेरर कनेक्शन भाजपचंच का? काँग्रेसचा सवाल

बंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणी संशयित म्हणून भाजपच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आल्यानंतर काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे. नेहमी भाजपचेच टेरर कनेक्शन का निघतं, असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ही बातमी टीव्ही चॅनेल दाखवणार नाहीत आणि ते का हे सगळ्यांनाच माहीत आहे, असा निशाणाही काँग्रेसने साधला.

रवा इडली खाल्ली आणि स्फोटकांची बॅग ठेवून गेला

कॅफेत आला तेव्हा आरोपीने चष्मा घातला होता. डोक्यावर टोपी होती. त्याने रवा इडली खाल्ली आणि हातातील स्फोटकांनी भरलेली बॅग कॅफेत ठेवून गेल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;