IPL 2024 – पंतमुळे बाकीचे होणार शांत; टी-20 वर्ल्ड कपसाठी यष्टिरक्षक म्हणून पंतलाच पसंती

IPL 2024 – पंतमुळे बाकीचे होणार शांत; टी-20 वर्ल्ड कपसाठी यष्टिरक्षक म्हणून पंतलाच पसंती

यंदाची आयपीएल ही आगामी टी-20 वर्ल्ड कपची निवड चाचणी आहे आणि ज्या खेळाडूचे नाणे खणखणीत वाजणार तोच अमेरिकावारी करणार, हे आधीच स्पष्ट झालेय. संघातील 15 पैकी 8 ते 10 खेळाडूंचे संघातील स्थान जवळजवळ पक्के मानले जात आहे आणि आता त्यात आणखी एका नावाची भर पडतेय. ती म्हणजे ऋषभ पंतची. पंधरा महिन्यांनंतर क्रिकेटमध्ये धडाकेबाज पुनरागमन करणाऱया पंतच्या फलंदाजीमुळे अनेकांचे प्रयत्न शांत होणार आहेत.

आयपीएल सुरू होण्यापूर्वी हिंदुस्थानी टी-20 संघाचे यष्टिरक्षणाची जबाबदारी काही काळ लोकेश राहुल तर काही काळ जितेश शर्मा सांभाळत होता. पण यष्टिरक्षक म्हणून इशान किशन सर्वात टॉपवर होता. मात्र आता सारे चित्र पालटले आहे. 15 महिन्यांपूर्वी अपघातात जखमी झालेला ऋषभ पंत आता परत आलाय आणि तेसुद्धा आपल्या नेहमीच्याच शैलीत. आयपीएलच्या गेल्या चार सामन्यांत त्याच्या बॅटमधून 18, 28, 51 आणि 55 धावांच्या खेळ्या निघाल्या आहेत. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये यष्टिरक्षक म्हणून पंतशिवाय दुसऱया कुणाचाही विचार केला जाऊ शकत नाही.

आयपीएलमध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या शर्यतीत असलेल्या यष्टिरक्षकांनी एकापेक्षा एक कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधण्यात यश मिळवल्यास सारेच अडचणीत येऊ शकतात. पंत पहिली पसंत असला तरी संजू, इशान आणि जितेश हेसुद्धा फार लांब नाहीत. त्यांच्या बॅटीतून धावांचा पाऊस आणि यष्टिरक्षणात चपळता दिसली तर एका यष्टिरक्षकाची निवड करताना अजित आगरकर आणि पंपनीची चांगलीच पंचाईत होऊ शकते.

बाकीच्यांचे काय होणार?

हिंदुस्थानचे किमान 30 पेक्षा अधिक खेळाडू सध्या टी-20 वर्ल्ड कपसाठी आपले नशीब अजमावत आहेत. त्यातच आयपीएलच्या पुढील दीड महिन्यात काही नवे चेहरेही निवड समितीला प्रभावित करू शकतात. त्यामुळे अंतिम 15 खेळाडूंच्या संघात कुणाची निवड होईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. पण यष्टिरक्षकासाठी लोकेश राहुल हीसुद्धा पसंती होती, मात्र त्याची संघात स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून वर्णी लागू शकते. त्यामुळे जितेश शर्मा, इशान किशन आणि संजू सॅमसन या गुणवान यष्टिरक्षकांचे काय होणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आजवर संजू सॅमसनवर नेहमीच अन्याय झाला आहे. तो अन्याय यंदाही कायम राहिला जाऊ शकतो. त्यातच संजू सॅमसनची फलंदाजी आणि त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सची उंचावलेली कामगिरी त्याच्या नावाचाही विचार करायला भाग पाडू शकते. या शर्यतीत बीसीसीआयच्या ब्लॅक लिस्टमध्ये आलेल्या इशानसाठी त्याची फलंदाजीच त्याला वाचवू शकते

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;