थॉमस आणि उबेर कपसाठी हिंदुस्थानचा तगडा संघ जाहीर
थॉमस आणि उबेर करंडकासाठी हिंदुस्थानच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये हिंदुस्थानचे दिग्गज मैदानात उतरणार असल्याने स्पर्धेत चमकदार कामगिरीची अपेक्षा करण्यात येत आहे. ही स्पर्धा चीनच्या चेंगदू येथे 27 ते 5 मे या कालावधीत पार पडणार असून अनेक दिग्गज विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. मात्र महिलांच्या उबेर करंडक स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने माघार घेतल्याने हिंदुस्थानी बॅडमिंटन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आगामी थॉमस करंडक स्पर्धेतील गतविजेते असलेले सर्व प्रमुख खेळाडू आपले काwशल्य पणाला लावणार असल्यामुळे यंदा या स्पर्धेत प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे. थॉमस करंडकात एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन, किदंबी श्रीकांत या अनुभवी खेळाडूंच्या खेळाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
थॉमस–उबेर कपसाठी हिंदुस्थानी संघ
थॉमस कप ः एकेरी ः एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, प्रियांशू राजावत, किरण जॉर्ज.
दुहेरी ः सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी, एम.आर. अर्जुन, ध्रुव कपिला आणि साई प्रतीक.
उबेर कप ः एकेरी ः अनमोल खरब, तन्वी शर्मा, अस्मिता छलिहा, इशारानी बरुआ.
दुहेरी ः श्रुती मिश्रा, प्रिया कोनजेंगबम, सिमरन सिंघी आणि रितिका ठाकर.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List